आरती साळूंखे यांच्याकडून गरीब लोकांना मदत; तब्बल ३० लाखांचे साहित्य वाटप

पुणे : कामगार कल्याण मंडळाकडून आरती सुरेश साळूंखे (तालुका. पाचगणी) यांनी २०० गरीब लोकांना प्रत्येकी १५००० हजार रुपयांचे भांड्याचे किट आणि घरगुती साहित्य दिले. २०० लोकांच्या साहित्याची एकूण किमंत तीस लाख रुपये आहे. साळूंखे यांच्या मदतीमुळे सर्वसामान्य कुटुंबीय आनंद व्यक्त करीत आहेत.

तब्बल ३० लाखांचे साहित्य वाटण्यात आले. यावेळी पाचगणी शहरातून कौतुक व धाडसी महिला महणून लोकांनी आरती साळुंखे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या मदतकार्यामुळे गरीब कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. एक महिला ऐवढे करू शकते याचा अभिमान आहे, असे म्हणत सातारा शहरातून भरत पवार, बार्शीतून मनोज साळूंखे, अजय पवार, कोल्हापूरमधून रणजित पोवार, सुहास पोवार, कराडमधून शिवाजी साळूंखे व इतर व कुरडवाडी मधून पवण चव्हाण तसेच पुणेकर सर्व समाज बांधवांनी साळुंखे यांचे अभिनंदन केले.

Advertisement

आरती साळुंखे यांचं काम कौतुकास्पद – अकबरजी शिकलकर

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पाचगणी शहरात राहणारे सातारा जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्या पत्नी आरती सुरेश साळुंखे यांनी कामगार कल्याण मंडळाकडून आर्थिक दुर्लभ घटकांसाठी जे भरीव काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया अकबरजी शिकलकर यांनी दिली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page