खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्हयातील मोका जेल रिलीज पाहिजे आरोपीस केले जेरबंद..!

दिनांक २१/०७/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार गुन्हे शाखा युनिट २ हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विजय पवार, सर्जेराव सरगर व शंकर कुंभार यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राजगड पोलीस स्टेशन येथील खुनाचा प्रयत्न अन्वये दाखल गुन्हयातील आरोपी हा सच्चाई मातानगर कात्रज हया ठिकाणी थांबलेला आहे. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांना कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्या प्रमाणे युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सच्चाई मातानगर कात्रज येथे जावुन पाहणी करुन आरोपी नामे महेश तानाजी घोगरे वय ३२ वर्ष रा. जैन मंदिराजवळ साईबाबा मंदिराजवळ कात्रज पुणे यास ताब्यात घेतले. सदर आरोपी बाबत राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे चौकशी केली असता सदर आरोपी हा राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४६/२०२६ भा.न्या.सं.क. १०९, ११८/२, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३ (५) मध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत माहिती मिळाली. सदर आरोपी हा रेकार्डवरील असुन राजगड पोलीस स्टेशन मोका जेल रिलीज आहे. सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकामी राजगड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातुपते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांचे सुचनांप्रमाणे पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संतोष टकले, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, आशिष यादव, सदाम तांबोळी, विनायक वगारे व सददाम तांबोळी यांनी केली आहे.




