बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल; वैद्यकीय पदवी नसताना करायचा व्यवसाय

पुणे – कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय तपासणी करुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. नवी पेठेतील नाडी परीक्षण करुन नागरिकांना औषधे देणाऱ्या बोगस डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग बबनराव देवडकर (वय ४०, रा. पायस सोसायटी, लोकमान्यनगर, नवी पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी डॉ. गोपाळ उजवनकर (वय ३८) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आरोप देवडकर याच्याकडे वैद्यकीय पदवी नसताना नाडी परीक्षण करुन तो नागरिकांना औषध देत होता. अशी तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच आरोपी देवडकर याची चौकशी केली असता, त्याच्याकडे वैद्यकीय पदवी, तसेच व्यवसायाचे प्रमाणपत्र आढळून आले नाही. महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट १९६१ चे कलम ३३ (१) उल्लंघन केल्याप्रकरणी देवडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page