दोन मोक्का सारख्या गंभीर गुन्हयांतील पाहिजे फरारी आरोपीस केले जेरबंद..!

मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्रीमती तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा

श्री. गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री. शैलेश संखे यांनी गंभीर व मोक्का गुन्हयामधील पाहिजे आरोपी यांना अटक करणेबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे व युनिट ३. गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अंमलदार असे पाहिजे आरोपीत यांचा गुन्हे शाखा, युनिट ३ चे कार्यक्षेत्रात शोध घेत असताना, सदर पथकातील पोलीस अंमलदार अतुल साठे व संदिप शेळके यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन वर नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे पंकज सुरेश वांभिरे वय २४ वर्ष, रा. गुजरात कॉलनी कोथरूड पुणे हा राहत्या घरी आलेला असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन कायेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. सदर माहितीच्या अनुषंगाने दि.१८/०७/२०२६ रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीच्या राहत्या घरी गुजरात कॉलनी कोथरूड पुणे या ठिकाणी जावुन शिताफीने पाहिजे आरोपी यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेतले.

Advertisement

त्यानंतर सदर आरोपीस पोलीस निरीक्षक युनीट ०३, गुन्हे शाखा, पुणे यांचे समक्ष हजर केले असता, त्याच्याकडे वर नमुद गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याचा कोथरुड मधील दोन गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यास १) कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५०/२०२५ भारतीय न्याय संहिता. कलम १०९, ३५२, ३५१, १८९(१), १८९ (४), १९१(२), १९०, १११(२), ६१ (२), ४९, ३ (५) सह आर्म अॅक्ट ३,२५,२७ म.पो.का ३७ (१) (३),१३५,१४२, क्रि. लॉ. अॅक्ट ३,७ व मोक्का कलम ३(१), (II),३ (२), ३ (४), ३(५).४. २) कोथरुड पोलीस स्टेशन गु र नं २५१/२०२५ भारतीय न्याय संहिता. कलम १०९, ३५२, ३५१(१), १८९(१),१८९(२), १८९(४), १९१(२),१९०,१११(२),६१(२),४९,३ (५), सह आर्म अॅक्ट ३,४,२५, क्रि. लॉ. अॅक्ट ३,७ मपोका ३७ (१) (३),१३५,१४२, मोक्का कलम ३(१), (II), ३(२), ३ (४) प्रमाणे या गुन्हयामध्ये त्यास पुढील कारवाई करीता सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ पुणे याचें ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्रीमती तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे शाखा श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार साठे, शेळके, तारु, तुपसौंदर, बोडरे, गायकवाड, चंदनशिवे महिला पोलीस अंमलदार वाघमारे, जगदाळे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page