घरफोडी, चोरी करणा-या आरोपीस ताब्यात घेवून घरफोडीचा ०१ गुन्हा आणला उघडकीस..!

दिनांक १९/०७/२०२६ रोजी अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं.१४८/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्याचा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -०१ मधिल पोलीस उप-निरी जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे व शिवाजी सातपुते हे समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गद्रे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरीलप्रमाणे दाखल गुन्हा करणारा इसम हा भंगार गोळा करण्याचे काम करीत असुन त्याचे नाव सोमनाथ भगवान मोरे रा. केळेवाडी, कोथरुड पुणे असे असुन तो सध्या वसंतनगर, केळेवाडी येथे त्याचे राहते घरी असल्याची खात्रीशीर गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने पो.उप.निरी. जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे व शिवाजी सातपुते यांनी सदर ठिकाणी जावुन सदर इसमाचा शोध घेतला असता सदर वर्णनाचा इसम मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सोमनाथ भगवान मोरे वय ३२ वर्षे, रा. वसंतनगर, विटेकर फॅब्रीकेशनचे जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिताफिने ताब्यात घेऊन त्याचेकडे अधिक चौकशी व तपास केला असता त्याने दिनांक १७/०७/२०२६ रोजी पौड फाट्याजवळील विघ्नहर कॉम्पलेक्स येथिल पहिल्या मजल्यावरील घरामध्ये चोरी केली असल्याचे कबुली दिली.
तरी वरीलप्रमाणे दाखल गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे सोमनाथ भगवान मोरे वय ३२ वर्षे, धंदा- काहीनाही, रा. वसंतनगर, विटेकर फॅब्रीकेशनचे जवळ, केळेवाडी, कोथरुड पुणे यास जप्त करण्यात आलेल्या ११,५००/- रु.किं.चा मुद्देमालासह पुढील कार्यवाही करीता अलंकार पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे ३ श्री. शंकर खटके यांचे सुचनांप्रमाणे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक श्री. मारुती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमित गद्रे, शिवाजी सातपुते यांनी केली आहे.




