संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीचा धारदार शास्त्राचा धाक दाखवत लैंगिक छळ

पुणे : अवघ्या सात वर्षांच्या शाळकरी मुलीला गळ्याला चाकू लावून ७८ वर्षांच्या वृद्धाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची वाच्यता आई-बाबांकडे करायची नाही, तसेच पोलिस घरी आल्यास जीव घेईन, अशी धमकी देत वृद्धाने हे कृत्य केले असून, त्याच्याविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याघटनेने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील सहकार नगर येथील बालाजी नगरमध्ये हा प्रकार घडला. मधुकर पीराजी थिटे (वय ७८) असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, थिटे व पिडीत मुलीचे कुटूंबिय एकाच भागात राहण्यास आहेत. त्यामुळे पिडीत ७ वर्षीय चिमुकलीला तो ओळखतो. दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी चिमुकलीला गोड बोलून आरोपीने घरी नेले. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत या चिमुकल्या मुलीकडून किळसवानी कामेकरून घेतली. नंतर तिला पुन्हा दुसऱ्या खोलीत नेहून तिच्यासोबत लैंगिक चाळे केले.

दरम्यान, चिमुकीलाला त्रास होत असल्याने ती ओरडली. तेव्हा नराधम आरोपीने तिचा गळा दाबला. तसेच तिच्या गळ्यावर चाकू ठेवून ‘तु कोणाला काही सांगायचे नाही. गप्प बसायचे, आई-पप्पाला कोणालाच काही सांगायचे नाही, अशी म्हणून धमकावले. पोलीस जर का माझे घरी आले तर मी तुझा जीव घेईल, अशी धमकी देत तिच्या जीवे मारण्याच्या भितीने अश्लील कृत्य केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, हा प्रकार गेल्या आठवड्यात घडला होता. तो नुकताच उघडकीस आला असून, लागलीच पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page