व्यावसायिकावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना २४ तासाच्या आत केले जेरबंद..!

व्यावसायिकावर हल्ला करणा-या हल्लेखोरांना २४ तासाच्या आत केले जेरबंद

दि.१४/०७/२०२६ रोजी कर्वेरोड, कोथरूड मधील मोबाईल व्यवसायिकावर काही हल्लेखोरांकडून लोखंडी कोयत्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्याअन्वये अलंकार पोलीस ठाणे, गुरनं १४६/२०२६ भान्यासं कलम १०९, १९ (२), १९१ (२) इतर व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा तसेच अज्ञात आरोपींचा शोध खंडणी विरोधी पथक १ कडील सपोनि प्रसन्न ज-हाड व खंडणी विरोधी पथक १ कडील अंमलदार घेत असताना पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे व रहिम शेख यांना गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश धुमाळ हा घोरपडे उद्यान, पुणे येथे गुन्हा करून लपला असल्याची मिळलेल्या बातमीवरून सपोनि प्रसन्न ज-हाड व खंडणी विरोधी पथक १ कडील अंमलदार यांनी घोरपडे उद्यान परिसरामध्ये सापळा लावून गुन्हयातील महत्वाचा सहभाग असलेला आरोपी नामे सिद्धेश नितीन धुमाळ, वय २५ वर्षे, रा. घोरपडे पेठ, पुणे यास ताब्यात घेवून गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे गुन्ह्यातील इतर साथीदार नामे २) नागेश उर्फ लाडू राजू मानिके, वय १९ वर्षे, रा. धानोरी रोड, भिमनगर, विश्रांतवाडी पुणे ३) राज तुषार धुमाळ, वय १९ वर्षे, रा पटवर्धन बाग, एरंडवणे पुणे व २ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना नमुद आरोपींकडून गुन्हयामध्ये खुनाच्या गुन्ह्याचा प्रयत्न करण्याकरिता इसम नामे (१) प्रसाद सुभाष मारणे, वय ३१ वर्षे, रा. संगम चौक, संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड पुणे (२) आदित्य अश्विनीकुमार डाके, वय २८ वर्षे, रा संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड पुणे (३) मेघराज ज्ञानेश्वर बारंगळे, वय ३५ वर्षे रा तुळजाभवानी मंदिराजवळ, न-हे, पुणे यांनी फिर्यादी यांच्या सोबत झालेल्या अंतर्गत वादामुळे खुनाच्या गुन्हयाची सुपारी दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार गुन्ह्यात मुख्य सहभाग असलेल्या एकूण आठ आरोपींना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेवून गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघड केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे). श्री. गौहर हसन, मा. सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा श्री. शैलेश संखे, यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश सागडे, युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सपोनि प्रसन्न जहिाड, सपोनि नानासाहेब कदम व पोलीस अंमलदार सयाजी चव्हाण, दुर्योधन गुरव, रहिम शेख, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब दांगडे, दयानंद तेलंगे पाटील, सचिन माळवे, नितीन कांबळे, मयुर भोकरे, किरण मोरे, नितीन बोराटे, सुहास जगताप, मुकुंद तारू, अतुल साठे, हानीफ शेख, अमित बोरडे, किशोर शिंदे, पुरूषोत्तम गुनला यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page