पत्नीने पतीचा चाकूने भोसकून केला खून; नऱ्हे भागातील घटनेने खळबळ

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरात मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने त्याचा चाकूने भोसकून खून करण्यात केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. किरपा बिप्त (वय ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी हिरा बिप्त (वय ४६) हिला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं का केला खून?

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, बिप्त मूळचे नेपाळमधील आहे. नऱ्हे भागातील मानाजीनगर परिसरात असलेल्या स्वप्नपूर्ती रेसीडन्सी सोसायटीत ते रखवालदार म्हणून काम करायचे. किरपाला दारू पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिऊन पत्नी हिराला त्रास द्यायचा. या कारणावरुन त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाले होते. हिराने चाकूने पती किरपावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली. किरपाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page