बनावट नोटांचे चिपळूण कनेक्शन; नागरी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाला अटक

मुंबई : बनावट नोटाप्रकरणी गुन्हे शाखेने रत्नागिरीतील चिपळूण नागरी पतसंस्थेचा व्यवस्थापक अमित कासार (वय ३६ ) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. कासारला २९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे.

गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर (वय ५०), राजेंद्र खेतले ( वय ४३), संदीप निवलकर (वय ४०) रुषिकेश निवलकर (वय २६) यांना अटक केली होती. आरोपी शिरलकर आणि खेतले हे चिपळूण मधील रहिवासी आहेत. खेतले हा व्यवसायाने चालक असून, शिरलकर याचे सर्विसिंग सेंटर आहे. संदिप आणि रुषिकेश हे व्यवसायाने सुतार असून खेडमधील रहिवासी आहेत. चौघांची कोठडी संपल्याने गुरुवारी न्यायालयात हजर केले होते. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Advertisement

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या कारसह चारही आरोपींजवळील मोबाईल ताब्यात घेतले आहेत. चौघांच्या चौकशीतून कासारचे नाव समोर आले आहे. कासार हा चिपळूण नागरी पतसंस्थेचा व्यवस्थापक आहे.

आणखी काही जण रडारवर

बनावट नोटा प्रकरणात थेट पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापकाचे कनेक्शन समोर आल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे या नोटा कशा आल्या?, या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास सुरु आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page