विधानसभा निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार?; राज ठाकरे म्हणाले…

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यातून रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची रणनीती, उमेदवारांची निवड कशी होईल, याबाबत भाष्य केले.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश राज ठाकरे दिले. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या लोकांना सत्तेत बसवायचे आहे. ही गोष्टी घडणार म्हणजे घडणार आहे. आम्ही सर्वच जण त्यासाठी तयारीला लागलो आहोत. युती होणार की नाही? हा विचार तुम्ही करु नका. परंतु आपण २०० ते २२५ जागा लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. १ ऑगस्टनंतर आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

१ ऑगस्टपासून राज्याचा दौरा

पावसापाण्याचा विचार करून १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय. मी राज्यात तालुक्यात जिल्ह्यात येईल. तिथे तुमची भेट होईल. तिथे कुणाच्या भेटी करायच्या आहेत,असं वाटतं त्यांच्याशी मी भेट घेईल. मेळावे घ्यावेत न घ्यावेत हे पाऊस पाहून ठरवू. पण तुमच्यासोबत बैठक घेणार आहे. ही माहिती देण्यासाठी मी तुम्हाला आज बोलावलं आहे. जे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष जे कोणी आले नसतील त्यांना टीम फोन करेल आणि कधी येणार हे सांगतील. एक दोन दिवसातच येतील. त्यानंतर तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा. अस ठाकरे म्हणाले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page