अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत वृक्षारोपण

पुणे : अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि स्वच्छ भारत अभियान अभियानांतर्गत आज बौद्धघाट या ठिकाणी गुरुपौर्णिमाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण करुन पर्यावरण पूरक असा संदेश देण्यात आला.

Advertisement

यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर जी शिकलकर तसेच महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष महेश शिंदे पाटील, महाराष्ट्र आयटी अध्यक्ष गणेश घाडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल बोराडे, पुणे शहराध्यक्ष महेश शर्मा, पुणे जिल्हाध्यक्ष अमर जगताप, वाहतूक विभाग पुणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण विभाग संतोष शितोळे, शिरूर तालुका अध्यक्ष योगेश भोसले, पिंपरी चिंचवड शहर संघटक ज्ञानेश्वर देवरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला व राहुल बोराडे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page