सासरच्या छळामुळे तरूणाची आत्महत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरकडील छळामुळे तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तेजसची आई शीला तानाजी चाळेकर (वय ४७, रा. नसरापूर, ता. भोर) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी ऐश्वर्या विजय पिंगळे, विजय नामदेव पिंगळे, शीतल विजय पिंगळे (सर्व रा. पौड, ता. मुळशी), ऋषीकेश उर्फ भाई सुनिल खेडकर, सुनील शिवलिंग खेडकर, भूषण सुनील खेडकर (रा. नसरापुर, ता. भोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडी भागात आशा, तेजस हे दोन मुलांसह राहायला होते. ८ ऑगस्ट २०२० मध्ये प्रेमसंबधातून तेजस आणि ऐश्वर्या यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




