मैदानात उतरा अन् ठोकून काढा; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

पुणे – विधानसभेच्या निवडणुकीची तयारी भाजपकडून केली जात आहे. निवडणूकीच्या प्रचाराचे रणशिंग भाजपने आज पुण्यातील अधिवेशनाने फुंकले. भाजपने विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयारी केली आहे. आता उत्तर देण्यासाठी आदेशाची वाट पाहू नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असा आदेश फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

विरोधक खोटा नरेटिव्ह पसरवतात. विरोधक म्हणतात सिलिंडरच्या किमती वाढल्या. आम्ही 2013 सालच्या सिलिंडरच्या किमती दाखवल्या. त्या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक होत्या. या किमती दाखवल्यानंतर ते गप्प बसतात. मी आत्मचिंतन करतोय. आपली एक अडचण आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं. पण प्रत्येकजण आदेशाची वाट पाहतो. आदेश आला तर मी उत्तर देईन. नाहीतर देणार नाही, असे प्रत्येकजण म्हणतो, असे फडणवीस म्हणाले.

Advertisement

आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. मैदानात उतरा. पण अट एकच आहे. हीट विकेट व्हायचं नाही. जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही. काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. ते असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा. तुम्हाला खोटं बोलायचंच नाही. खरं बोलायला विचार करावा लागत नाही. त्यांना खोटं बोलायचं आहे. तुम्हाला खरं बोलायचं आहे. तुम्ही सगळे मैदानात उतरले पाहिजेत, असा आदेशच फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

मोदींनी आरक्षणाची मर्यादा वाढवली

मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली, पण एक खोटा नरेटीव्ह तयार केला की हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार. पण, खोटं फार काळ टिकत नाही, खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली. विधान परिषदेत आम्ही टाचणी लावली आहे. हे म्हणत होते महायुतीचे आमदार फुटणार, अरे तुमचे 20 कधी फुटले हे तुम्हाला कळले देखील नाही, असे म्हणत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेसवर फडणवीसांनी निशाणा साधला.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page