शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर उल्लेखनिय कामगिरी सातारा जिल्ह्यात शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हातचालाखी, व बतावणी करुन फरार असलेला सराईत ईराणी आरोपी शिवाजीनगर पुणे पोलीसांच्या जाळ्यात..!

दिनांक ०४/०४/२०२६ रोजी शाहुपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र.८४/२०२६ बी.एन.एस. कलम ३१८ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज मधील अनोळखी संशयित आरोपीचे फुटेज हे पोलीस व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्राप्त झाल्याने त्या संशयित आरोपीचे फुटेज हे पोलीस अंमलदार ३५१६/महेंद्र कडु यांनी त्यांच्या गुप्त बातमीदारांना नमुद गुन्हेबाबत माहिती देऊन सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपीबाबत काहीएक माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्यास सांगितले असता, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार/३०८१ मेमाणे, पोलीस नाईक/२२९७ जाधव, पोलीस अंमलदार/३५१६ कडु, पोलीस अंमलदार/९८३९ झांबरे असे शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असतांना पोलीस अंमलदार/३५१६ कडु यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन माहिती प्राप्त झाली कि, शाहुपुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्र.८४/२०२६ बी.एन.एस. कलम ३१८ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी हा इराणी वस्ती शिवाजीनगर पुणे येथे राहणारा इब्राहिम बाबु इराणी असल्याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही वर नमुद पोलीस स्टाफसह आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतले असता, मिळुन आला व कसुन चौकशी केली असता त्याने शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २७/०३/२०२६ रोजी आय.डी.बी.आय बँक, प्रतापगंज पेठ, सातारा येथील बँकेतील एका वृद्ध महिलेकडुन हाथचालाखी करुन तिचेकडे असलेल्या रोख रक्कमेपैकी ७०००/ रुपये काढुन घेऊन निघुन गेला अशी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणुन शाहुपुरी पोलीस ठाणे सातारा यांचेशी संपर्क साधुन आरोपीस शाहुपुरी पोलीस ठाणेचे अधिकारी आणि इतर पोलीस अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उप निरिक्षक शाहुपुरी पोलीस स्टेशन हे करत आहेत. आरोपी नामे इब्राहिम बाबु इराणी याने ज्येष्ठ नागरीकांची फसवणुक व चोरी केल्याचे गुन्हे पुणे ग्रामीण, पुणे शहर, रायगड इत्यादी ठिकाणी केलेले आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी हि. मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री. राजेश बनसोडे सर, कृषिकेश रावले पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ पुणे शहर, मा.श्री. चंद्रकांत भोसले सहाय्यक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली गिरिशकुमार दिघावकर वरिष्ठ पोलीस निरिक्षक, अमर काळंगे पोलीस निरिक्षक (गुन्हे), श्री. संतोष पाटील सहायक पोलीस निरिक्षक, श्री. प्रमोद पाटील पोलीस उप निरिक्षक, पोलीस हवालदार संतोष मेमाणे, पोलीस नाईक सचिन जाधव, पोलीस अंमलदार महेंद्र कडु, रोहित झांबरे यांच्या पथकाने कामगिरी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page