चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद

दिनांक १३/०५/२०२६ रोजी रात्रौ २१/३० वा. सुमारास आंबेगांव रोडने दत्तनगर येथून फिर्यादी हया त्यांच्या घराचे दिशेने पायी चालत जात असताना त्यांचे समोरुन दत्तनगर चौकाकडुन रस्त्याने एका काळ्या रंगाची दुचाकी मोटार सायकलवरुन दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या जवळ जावून त्यांच्या गळ्यातील मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरी करून पळून गेले त्याबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने आंबेगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २०९/२०२६, भा.न्या.सं.क २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयाचे अनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनडकील तपास पथकाचे अंमलदार यांनी २०० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपी निष्पन्न केले. सदरचे आरोपी हे सासवड परिसरात असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाचे पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते व प्रमोद भोसले यांना मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या आदेशान्वये आंबेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक, युवराज शिंदे व तपास पथकाचे अंमलदार असे सदर ठिकाणी जावून आरोपीचा कसोशीने शोध घेवून त्यांना शिताफीने पकडले. त्यांना त्यांचा नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) रोहित राजु माने वय २० वर्षे काम काहीनाही सध्या रा. मु.पो. खंडोबानगर झोपडपट्टी, सासवड पुणे यापुर्वी रा बाबर प्लॉटींगजवळ, दत्तमंदिरमागे, खोपडेनगर, भारतनगर, गुजर निंबाळकरवाडी, कात्रज पुणे २) ओमकार विकास नाईक वय २२ वर्षे रा. लक्ष्मी वजन काट्याजवळ, नवीन सकाळ प्रेसच्या शेजारी, संभाजीनगर, वडकी पुणे अशी असल्याचे सांगितले तसेच त्यांनी गुन्हा केला असल्याचे मान्य केल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना आंबेगांव पोलीस स्टेशन येथे आणून नमुद दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीच्या ३ दुचाकी व १० ग्रॅम सोने असा एकूण ०२,४०,०००/- रुपयाचा मुदेमाल जप्त केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर, श्री. मिलींद मोहिते, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरिश गायकवाड, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, शिवाजी पाटोळे, फिरोज शेख, अजय कामठे, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, राकेश टेकवडे अवधूत जमदाडे यांनी केली आहे.




