स्व. आनंद दिघेंच्या आश्रमात नोटा उधळल्या; शिंदेंकडून शिवसेना पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

मुंबई: दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आश्रमात काही शिवसेना नेत्यांनी ढोलताशांवर नोटांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आनंद दिघे यांचे आश्रम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुस्थान मानले जाते. या व्हायरल व्हिडिओवरून विरोधकांनी शिवसेनेला धारेवर धरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत त्या शिवसेना नेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नोटांचा वर्षाव करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.आता शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने पत्रक जारी करण्यात आले असून दोन शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातील शाखाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या सहीने ते पत्र जारी करण्यात आले आहे.
ठाण्यात दिनांक 12 स्पटेंबर 2024 रोजी, गणपती विसर्जनाच्या रात्री धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आश्रमामध्ये जे कृत्य घडले, ते अतिशय निंदनिय असून त्यामुळे पक्षावर चौफेर बाजुने टिका होत आहे. सदर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. तरी या कारणास्तव आपल्याला पदावरून काढुन टाकण्यात येत आहे. तरी सदर घडलेल्या प्रकारबद्दल आपण दोन दिवसात खुलासा करावा, असे पत्रच पैसे उधळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या दोन्हीही शाखाप्रमुख निखिल बुडजडे, नितीन पाटोळे यांच्यावर पक्षातर्फे कारवाई करण्यात आलेली आहेत. ठाणे जिल्हाप्रमुख व शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी पक्षातर्फे कारवाई केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




