पुण्यात घरफोड्यांच सत्र सुरुच; कोरेगांव पार्क परिसरात भरदिवसा बंगला फोडला

पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोरेगांव पार्क परिसरात चोरट्यांनी भरदिवसा बंगला फोडत १० लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरीच्या पोलिसांना थांबवता येत नसल्याचे दिसत आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात ३७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी पावणे बारा ते सायंकाळी साडे सहा यावेळेत घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोरेगांव पार्क येथील लेन सी परिसरात राग विलास सोसायटी येथे राहण्यास आहेत. दरम्यान, बुधवारी ते काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेव्हा अज्ञात चोरट्यांनी सकाळी पावणे बारा ते सायंकाळी साडे सहा यावेळेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, घरातील लाकडी कपाटात ठेवलेले सोन्याचे, हिऱ्याचे दागिने चोरून पोबारा केला. तक्रारदार परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. लागलीच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. कोरेगांव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे हे करत आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




