जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला..!

पुण्यातील जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री माननीय श्री. अमितजी शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
श्रद्धेय स्व. मोरोपंत पिंगळे जी यांच्या प्रेरणेतून १९४९ साली स्थापन झालेल्या जनता सहकारी बँकेने आज विश्वासार्हतेचा ७५ वर्षांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे. या ७५ वर्षांत ग्राहकांचा विश्वास संपादन करून १५ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करत एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केला आहे. याप्रसंगी बँकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व सभासदांचे अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे जी, उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार जी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय श्री. चंद्रकांतदादा पाटील जी,j बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र हेजीब जी, उपाध्यक्षा सौ. अलका पेटकर जी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगदीश कश्यप जी तसेच पदाधिकारी, अधिकारी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते




