कर्जतच्या जंगलात पुण्यातील महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

पुणे – पुण्यात आधी स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्या मुलींसोबत शोषणाची घटना घडली. त्यानंतर बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका तरूणीवर तिघांनी मिळून सामूहिक अत्याचार केला. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेच अपहरण करण्यात आलं. जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीने पीडितेला कारमध्ये बसवून अपहरण केलं. त्यानंतर पुणे कर्जतच्या जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मारहाण देखील केली. इतकंच नाहीतर २ दिवस घरात डांबून देखील ठेवलेले होते. आरोपीने जबरदस्ती करत पीडितेच्या गळ्यातील मंगळसूत्र देखील तोडले, या प्रकरणी पोलिस चौकशी करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




