पुण्यात पोलिसाची बस चालकाला बेदम मारहाण, नेमकं काय घडला प्रकार?

पुणे : पीएमपी बसचालकाला रविवारी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने बसमध्ये जाऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांनी पोलिसावर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा व्हीडीओ समाजमाध्यमातून व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा प्रकार पोलीस ठाण्यात पोहोचला असता दोघांनाही समजावून सांगितल्याने कोणतीही तक्रार नोंदविण्यात आली नाही. मारहाण करणाऱ्या पोलिसाने माफी मागितल्यावर प्रकरणावर पडदा पडला. तसेच मारहाण करणाऱ्या पोलिसाकडून पीएमपीने बसचा खोळंबा केल्याबद्दल रितसर तीन हजारांचा दंड वसूल केला. त्याची त्याला पावतीही दिली आहे.

नेमंकाय घडला प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, वाडीया महाविद्यालयापासून मार्ग क्रमांक सी ३०२ न.ता. वाडीकडे पीएमपी बस प्रवाशांनी घेवून निघाली होती. त्यादरम्यान एक पोलीस कर्मचारी दुचाकीने प्रवास करत होता. अचानक पोलिसाने त्याची दुचाकी बस समोर आडवी लावली. पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीवरुन उतरुन वाहकाला शिवीगाळ केली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याकडून वाहकाला बेदम मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. पोलिसाने डोक्यात हेल्मेट परिधान केले आहे. तो पीएमपी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करताना दिसत आहे. त्यावेळी वाहकाकडून बचाव केला जात असल्याचे दिसत आहे. वाहकाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मला का मारत आहेस, नेमकी काय चुक झाली आहे, तुला काय हवे आहे, अशी विचारणा केली जात आहे. मात्र त्यानंतरही पोलीस कर्मचारी मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. दुचाकीला बाजूला दाबले आहे का, रस्त्याचे काम सुरु आहे, असे सांगून वाहक पोलीस कर्मचाऱ्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यावर पोलीस कर्मचारी कोणतीही प्रतिक्रिया न देता मारहाण करुन बसमधून बाहेर गेल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

समज देवून पोलिसांनी सोडून दिले

या प्रकारामुळे पीएमपी वाहकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. परंतु हा मारहाणीचा प्रकार घडल्यानंतर पीएमपी वाहकाने जवळच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांने मारहाण केल्याची तक्रार केली, त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांनी बस वाहकाला आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला समजावून सांगितले. पोलीस तक्रार केली तर दोघांनाही त्रास होईल, असे समजावून सांगितले. फौजदारी कारवाई होईल, या भीतीने पोलीस कर्मचाऱ्याने वाहकाचा माफी मागितली. तसेच वाहकाने देखील पोलिसांचा कोणत्याही प्रकारचा ससेमिरा मागे लागू नये, म्हणून रितसर पोलीस तक्रार केली नाही. दोघांनाही समज देवून पोलिसांनी सोडून दिले. तसेच पोलीस कर्मचाऱ्याकडून लेखी घेतले. असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page