खडक पोलिसांकडून गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई; दोन टेम्पोसह10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुण्यात खडक पोलिसांनी अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. अवैधपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन पॅगो टेम्पोवर खडक पोलिसांनी कारवाई करुन दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. लोहीयानगर भागातील विराणी स्टील गल्लीमधील सोनमार्ग थिएटर समोर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अकिब शकील शेख (वय-32 रा. ए.पी. लोहीयानगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार हर्षल चंद्रकांत दुडम (वय-42) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शनिवारी रात्री हद्दीत पेट्रोलींग करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना माहिती मिळाली की, सोनमार्ग थीएटर समोर दोन टेम्पोमध्ये अवैध गुटखा आहे. त्यानुसार तपास पथकाला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पथक लोहीयानगर येथे गेले असता सोनमार्ग थिएटरसमोर दोन पॅगो टेम्पो उभारल्याचे दिसून आले. आरोपी त्यामध्ये गुटखा ठेवून लॉक करताना दिसून आला. पथकाने त्याठिकाणी छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला 6 लाख 17 हजार 700 रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखू (गुटखा), रोख रक्कम, चार लाख 1 हजार 500 रुपयांचे दोन टेम्पो असा एकूण 10 लाख 21 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक प्रल्हाद डेंगळे करीत आहेत
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे व पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, लखन ढावरे, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, भालचंद्र दिवटे, दिनेश अवघडे यांच्या पथकाने केली.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




