ऐतिहासिक वाघनखे लंडनहून साताऱ्यात दाखल, कधी पाहता येणार?

सातारा – छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल झाली आहेत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून कोणालाही प्रवेश दिला जात नाही. 19 जुलै रोजी याचं दिमाखात मोठं स्वागत केलं जाणार आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनख्यांसाठी विशेष अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. वाघनख्यांचे जंगी स्वागत जिल्हा प्रशासनासह साताऱ्यातील शिवभक्त करणार आहेत. या स्वागतासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखं सातारा जिल्हा हद्दीत दाखल झाल्यानंतर येत्या19 जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं शिवभक्तांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे.

Advertisement

लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली ही वाघनखे बुधवारी सकाळी विशेष विमानाने महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाली. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात या वाघनखांचा स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. एका टेम्पोतून ही वाघनखे साताऱ्यातील वस्तु संग्रहालयात सुरक्षित आणण्यात आली. या वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे शुक्रवारी (दि. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शनिवारपासून (दि. २०) हे प्रदर्शन सर्व नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात येणार आहे. वाघनखे सात महिने सातारा येथील संग्रहालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहील. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून घेता येतील. हे प्रदर्शन एकावेळी दोनशे लोकांना पाहता येतील येईल.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page