चेन स्नॅचींग तसेच पोलीस बतावणी करुन फसवणुक करणारा गेली ०८ महीन्यापासुन फरार सराईत आरोपीस केले जेरबंद..!

मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे खंडणी विरोधी पथक २ गुन्हे, शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले यांना गोपनिय बातमी मिळाली की, वाघोली स्टेशन गुन्हा रजि नंबर ३३/२०२२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (५), ३ (५) गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे मुसली मनासीर बेग (इराणी) वय ३७ रा. पठारे वस्ती लोणीकाळभोर पुणे येथे राहते घरासमोर बसल्याची गोपणीय माहिती मिळाली.

Advertisement

सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन योग्य ती कारवाई करण्याबाबत मुफजल आदेश दिले. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे असे पठारे वस्ती लोणीकाळभोर येथे रवाना झाले. तेथे जावुन जमलेल्या जमावातुन त्यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यास रिपोर्टाने वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदरच्या आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४४६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम २०४,३१६ (२), ३१८ (४), ३ (५) नुसार गुन्हा दाखल असुन त्यात देखील तो पाहीजे आरोपी असलेबाबत माहीती समजली आहे. वर नमुद आरोपीवर महाराष्ट्रातील विविध पोलीस येथे चेन स्नॅचिंगचे पोलीस बतावणी, वाहन चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजन शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलील अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे यांनी सदरची कामगिरी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page