आई रागावली म्हणून मुलीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे – पुण्यातून एक धक्कादायक बातमी आली आहे. आईने रागावले म्हणून आठवी वर्गातील मुलीने 13 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना हडपसर भागातील अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती हडपसर पोलिसांनी दिली.

नेमकं काय घडलं?

Advertisement

अल्पवयीन मुलगी, तिची आई, आठ वर्षाचा मुलगा, मावस भाऊ, बुधवारी दुपारी घरी होते. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आईने मुलीला अभ्यासाला जा, असे सांगितले. या कारणावरुन मुलीला राग आला. त्यानंतर मुलीने 13 व्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page