टिपु पठाण टोळीमधील मोका गुन्हयामधील दोन पाहिजे आरोपीस परराज्यातुन केले जेरबंद..!

पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर पाहिजे/फरारी असलेल्या आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट-५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.

काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०८ (२) (३) (४),१२६(२),१८९(२),१९०,३५२, ३५१(३), ३२९ (३),६१ (२) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि. सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयामधील पाहिजे असलेले आरोपी १) साजीद झिब्राइल नदाफ, वय २७ वर्षे, रा. स नं ०५ वेताळबाबा वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे २) इरफान नासीर शेख २७ वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं १७, आयशा मस्जिद शेजारी, हडपसर पुणे हे अनुक्रमे वेताळबाबा वसाहत व सय्यदनगर भागात येणार असल्याची गोपनीय खबर पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी साजीद झिब्राइल नदाफ यास वेताळबाबा वसाहत मंदिराजवळुन व इरफान नासीर शेख यास सय्यदनगर, आयशा मस्जिद शेजारील रोडवरुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांचे पथकाने केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page