“ताई आहे का घरातं, तुतारी आलीया…; बापूसाहेब पठारे यांच्या प्रचाराला सुरुवात

पुणे – राज्यात सध्या राजकीय रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अनेकांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्व राजकीय नेत्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. अशातचं आता इकडे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच प्रचाराला प्रारंभ केला आहे. आता मात्र पठारेंच्या प्रचाराला वेग आला आहे. ताई आहे का घरातं, तुतारी आलीया दारातं, अशा प्रकारची गाणी गात घरोघरी पठारेंचा प्रचार सुरू आहे.

दिवाळीच्या काळात थंडावलेल्या प्रचाराने आता पुन्हा एकदा वेग घेतला आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सुरुवातीपासूनच बापूसाहेब पठारे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील घरोघरी भेट देत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. मंगळवारी सकाळी तर वडगाव शेरी परिसरात प्रचाराची दिंडी पाहायला मिळाली. अनेक लहान थोर आणि चिमुरडे वारकऱ्यांच्या वेशात या दिंडीत सहभागी झाली होते. टाळ मृदुंग आणि तुतारीच्या गजरात बापूसाहेब पठारे यांचा प्रचार सुरू होता. तर काही नागरिकांनी ताई आहे का घरात तुतारी आली या दारात अशा प्रकारची गाणी गाऊन मतदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केलाय.

Advertisement

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे आणि अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्यात लढत होणार आहे. बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी मिळणार हे खूप आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यांनी आधीपासूनच घरोघरी भेट देत प्रचाराला सुरुवात केली होती. तर सुनील टिंगरे यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली. तत्पूर्वी महायुतीकडन उमेदवारी कोणाला मिळणार यावर चर्चा झाली. आणि अखेर सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी मिळाल्यानंतर सुनील टिंगरे हे देखील प्रचारात सक्रिय झाले. त्यामुळे वडगाव शेरीत या दोन्ही उमेदवारांच्या रूपाने काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी शक्यता आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page