बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावली, VIDEO सोशल मिडीयावर व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू संभाजीनगर दौऱ्यात आहेत. या दौऱ्यात बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची माहिती समोर आली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार घडला. राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

Advertisement

छत्रपती संभाजी नगरमध्ये राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र त्या इ-रिक्षा खराब होत्या अशी तक्रार दिव्यांगांनी बच्चू कडू यांच्याकडे केली. त्यामुळे बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचारी यांना रिक्षा पाहण्यासाठी बोलावले होतं. मात्र कंपनीने माहिती नसलेल्या एक कर्मचारी पाठवला. त्यामुळे बच्चू कडू चांगलेच त्याच्यावर संतापले आणि त्याच्या कानाशिलात लगावली, जर तुला काही माहितीच नाही तर इथे आला कशाला असा सवाल बच्चू कडू यांनी त्याला केला आणि या वेळेस उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापलं.

योजनेतून जवळपास 500 रिक्षांचे वाटप करण्यात आलंय, 500 पैकी 250 ते 300 रिक्षा या खराब असल्याचं बच्चू कडू यांचे म्हणणं आहे, कानाशिलात लगावलेला अधिकारी नाही तर कंपनीचा कर्मचारी होता असे कडू म्हणाले, या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात असे कडू यांनी सांगितलं.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page