आंदेकर टोळीतील ०८ महिन्यापासुन पाहिजे असलेला रेकॉर्डवरील आरोपीस लोखंडी कोयत्यासह केले जेरबंद

मा. वरिष्ठांनी पुणे शहरातील सुर्यकांत उर्फ बंडु राणोजी आंदेकर, सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे यांचे टोळीतील सक्रिय/असक्रिय सदस्य आणखी गंभीर गुन्हे करण्याची दाट शक्यता असुन फरारी / पाहीजे आरोपीत यांचा रोजचे रोज शोध घेऊन ते मिळुन येताच त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच त्यांचेवर कडी निगराणी ठेवावी त्यांचेकडुन कोणताही गंभीर गुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी. असे गुन्हे शाखेला आदेश दिलेले होते.

Advertisement

सदर आदेशाच्या अनुषंगाने दिनांक ०८/०६/२०२६ रोजी युनिट ०१ गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. अजित जाधव, पो.उप-नि. राहुल मखरे व पोलीस अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व हेमंत पेरणे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, ‘बंडु आंदेकर टोळीतील सक्रिय रेकॉर्डवरील आरोपी ओम नगरकर, रा.सध्या हडपसर, पुणे हा सोलापुर बाजार पीएमपीएमएल बस स्टॉप समोरील कॅनॉल लगत असलेल्या परिसरात आला असुन तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करणेची दाट शक्यता असुन त्याचेकडे घातक शस्त्रे आहे, अशी खात्रिशीर बातमी मिळाल्याने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन ऑम गणेश नगरकर, वय २४ वर्ष, रा. ३२ म.न.पा.शाळेजवळ, यश रेसिडन्सीचे टेरेसवर, हडपसर गांव, पुणे. पूर्वी रा.४०१ प्रतिभा कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊस चौक, पुणे यास ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एक ५००/- रुपये किंमतीचा लोखंडी कोयता व एक ५०००/- रु किंमतीचा मोबाईल मिळुन आल्याने त्याचे विरुध्द लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२८/२०२६ आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो. अधि. क. ३७ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच सदरचा आरोपी हा समर्थ पोलीस स्टेशन गु.र.नं. २२३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३५३ (२),१२५.३ (५) प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये ०८ महिन्यापासुन पाहिजे आरोपी असल्याचे माहिती मिळाली आहे. पुढील आधिक तपास लष्कर पोलीस स्टेशन हे करीत आहेत

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संजय दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त, तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री गौहर हसन, श्री. शैलेश संखे सहा पोलीस आयुक्त गुन्हे १. यांचे मार्गदर्शना खाली युनिट ०१ कडील श्री. अजित जाधव, पोलीस निरीक्षक यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक, श्री. राहुल मखरे पोलीस अंमलदार विनोद शिंदे, निलेश साबळे, हेमंत पेरणे, सिध्देश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, संदेश काकडे, अमित जमदाडे, मयुर भोसले, अविनाश दळवी, यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page