सराईत चोरट्यास न्यायालयाकडुन सुनावली शिक्षा..!

पोलीस स्टेशन बाणेर येथे दिनांक २४/१०/२०२५ रोजी फियादी यांनी त्याचे आरटीझेन कॅफे या दुकाणा मध्ये काम करणारा त्याचा नोकर नामे निलेश विष्णू कदम वय 31 वर्ष रा. दुरशेत ता. खालापुर जि रायगड याने दुकाणातील दोन मोबाईल व 15 हजार रुपये रोख असा एकूण 29000/- रुपयांचा माल चोरून नेला अशी फिर्याद दिली होती. सदर फिर्यादवरून बाणेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजी नं 247/2025 भा.न्या.स कलम 306 नुसार दाखल केला होता. नमुद चोरटा हा गुन्हा केल्या पासून फरार होता. फरार आरोपीचा शोध तपास पथक घेत असतांना नमुद आरोपी हा मुंबई येथे असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. नमुद आरोपीस पथकामधील पोलीस अधिकारी के बी डाबेराव गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे यांनी अंधेरी भागात शोध घेवून आरोपीस अटक केली. आरोपी कडून गुन्हयात चोरी गेलेला माल जप्त केला.

तपास अधिकारी बाबासाहेब आहेर यांनी गुन्ह्याचा कसून बारकाईने तपास केला असता नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे व व्यापा-यांकडे कामास राहून विश्वास संपादन करून त्यांचे कडे चोरी करतो, अशी त्याची गुन्हा करण्याची पध्दत असल्याची माहिती प्राप्त केली. आरोपीस या पुर्वी फरासखाना पोस्टे गुरन 295/2023 भादवि कलम 380 मध्ये तीन महिन्याची शिक्षा झाली होती.

बाणेर गुन्याचे तपासात आरोपी कडून गुन्हयात चोरी केला माल मोबाइल जप्त करण्यात आले होते तसेच तपासात पुरावा नाहीसा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास अधिकारी यांनी गुन्हयात भा न्या स कलम 238 तसेच भा न्यास कलम 13 ची वाढ करून सबळ पुरावे गोळा करून आरोपीचे विरुद्ध दोषारोप पत्र मा न्यायलयात दाखल केले.

Advertisement

मा प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी कोर्ट नं 09 यांनी सदर प्रकरणात नियमित सुनावणी घेऊन प्रकरण नियमित चालविले. सदर प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील म्हणून श्रीमती शैला घोडेस्वार यांनी कामकाज पाहले तर कोर्ट पैरवी म्हणून पो हवा 5720 शंकर सोनवने यांनी कामकाज पाहून महत्त्वाचीभूमिका बजावली.

सदर प्रकरणात सर्व साक्ष पुराव्याचे अध्ययन करून मा न्यायमुर्ती श्री अमोल शिंदे साहेब, प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी कोर्ट नं 09 यांनी आरोपीस भान्यास कलम 306 मध्ये तिन महिने भा.न्या.स. कलम 216 नुसार 03 महीने तसेच आरोपीने पूर्वी चोरीचे गुन्ह्यात शिक्षा झालेली असतांनाही पुन्हा गुन्हा केल्याने भा न्या स कलम 13 नुसार सहा महिण्याची शिक्षा केली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. चुलूमुला रजनीकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग,

पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, गजानन अवातिरक, शरद राऊत, रोहीत पाथरुट, स्वप्नील मराठे बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page