एक वर्षापासुन पाहिजे असलेल्या रेकार्डवरील सराईत आरोपीस केले जेरंबद

दिनांक ०८/०६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे परिमंडळ ०२ हद्दीत गुन्हे प्रतिबंध गस्त व रेकार्डवरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार व सर्जेराव सरगर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराव्दारे बातमी मिळाली की, सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२६/२०२५ भा.न्या.सं.क.११८ (२), ३ (५) आर्म अॅक्ट ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हा मधील पाहिजे आरोपी नामे शुभम भास्कर लोखंडे हा तळजाई वसाहत पुणे या भागात फिरत आहे. सदरची बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले. युनिट २ पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने तळजाई वसाहत सहकानगर पुणे येथे जावुन पाहिजे आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम भास्कर लोखंडे वय २३ रा. तळजाई पठार स नं ३ मल्हार जिम शेजारी धनकवडी पुणे असे सांगीतले. सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता तो आंबेगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १५८/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ मध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत निष्पन्न झाले. सदर आरोपीस आंबेगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अभिलेखावरील रेकार्डवरील गुन्हेगार आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे श्री. गौहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त-१ श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरी. ज्ञानेश्वर दवळी, पोलीस अंमलदार शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय टकले, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, योगेश

मांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ओमकार कुंभार, रुषिकेश व्यवहारे व विनायक वगारे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page