प्रतिबंधित ई सिगारेट व हुक्का फ्लेवर बेकायदेशीरपणे विक्री करणा-यास केले जेरबंद

दिनांक ०८/०६/२०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीत स्मोक हेवन शॉप, निको गार्डन विमाननगर पुणे या शॉपमध्ये बेकायदेशीरपणे ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री होत असले बाबतची गोपनीय बातमी पोलीस अंमलदार लालु कहे यांना प्राप्त झालेने विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी नितीन राठोड व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी स्मोक हेवन शॉपवर छापा टाकला असता, सदर ठिकाणी मोहम्मद फाईज फारुख शेख वय २२ वर्ष रा. स्पर्श व्हिला, फ्लॅट नंबर ३०४, बालेवाडी पुणे (मुळ रा. संथडका चारला, कुलुर पोस्ट चारला जि. कासारगोड, राज्य केरला) हा मिळुन आला. पंचांचे समक्ष सदर शॉपची झडती घेतली असता नमुद ठिकाणाहून एकुण ०१,५७,०००/- रु. किंमतीचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई सिगारेट व संबंधित इतर साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे. ताब्यात घेतलेल्या इसम व शॉपचे मालकाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. २९३/२०२६ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक नवनाथ क्षिरसागर हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०७, पुणे शहर (अतिरीक्त कार्यभार), श्री. प्रशांत अमृतकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग पुणे शहर (अतिरीक्त कार्यभार), श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश बोलके यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कहे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोंम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड, सना शेख यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page