ब्राऊन शुगर (हेरॉईन) व पॉपी स्ट्रें (डोडाचूरा) अंमली पदार्थविक्रीसाठी जवळ बाळगणा-या इसमास केले जेरबंद..!

दि.३०/०५/२०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी व तपास पथक पोलीस अंमलदार असे गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करित असताना केसनंद रोड, जोगेश्वरी विदयालय येथील, बस स्टॉप जवळ पेट्रोलींग करित असताना सहा. फौजदार बाबासाहेब मोराळे, पोलीस अंमलदार अशोक शेळके, सुनिल कुसाळकर यांना संशयित एक इसम दिसल्याने त्यास हटकले असता तो पळुन जाण्याचे तयारीत असल्याने त्यांचेवर अधिक संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव शिव कालू सिंह वय ३३ वर्षे, रा. गल्ली नंबर ६, बालाजीनगर, केसनंद रोड, वाघोली, पुणे. मुळगाव मु.पो. कानसिंगकीसिड, ता. पलोदी, जि. जोधपूर, राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले. त्यावेळी शिव कालू सिंह याची अंगझडती घेतली असता ११,३८,९००/- रू किं ची ३२ ग्रॅम ५४० मिली वजनाची ब्राऊन शुगर (हेरॉईन) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने जप्त करून गु.र.नं. ३६४/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याची पोलीस कस्टडी घेवून त्याचे राहते घराची झडती घेतली असता १,८०४/- रू किं चा १२० ग्रॅम २८० मिली वजनाचा पॉपी स्ट्रें (डोडाचुरा) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने जप्त करून एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार कलम १५(अ) वाढ करण्यात आली आहे. असा एकुण ११,४०,७०४/- रु किं चा ब्राऊन शुगर (हेरॉईन) व पॉपी स्ट्रॅ (डोडाचूरा) असे दोन अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त केले आहेत. अधिक तपास तपास पथक अधिकारी मनोज बागल करित आहेत.

Advertisement

सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त विषेश शाखा, अति. कार्य, परीमंडळ ७, पुणे शहर, श्री. प्रशांत अमृतकर, मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नुतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन, श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती पल्लवी मेहेर, वाघोली पोलीस स्टेशन, तपास पथक अधिकारी पोउपनि/मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, मंगेशजाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपककोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, यांनी केली

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page