मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी; मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून ही अंमलबजावणी होणार आहे.

कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी?

Advertisement

आनंदनगर टोलनाका
दहिसर टोलनाका
मुलुंड-एलबीएस टोलनाका
वाशी टोलनाका
ऐरोली टोलनाका

टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page