कोंबीग ऑफरेशन दरम्यान आरोपीकडुन २९ नग एल.एस. डी. स्टॅम्प, ३० ग्रॅम सुका चरस, ६८ ग्रॅम हायडोजेनिक गांजा व इतर अमंली पदार्थ साहित्य असा एकुण ५,४८,०००/- रु किमंतीचा अंमली पदार्थ व इतर माल हस्तगत करण्यात फरासखाना पोलीसांना यश

मा. वरिष्ठांचे आदेशान्वये अमंली पदार्थ सेवन करणारे तसेच विक्री करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने फरासखाना पोलीस स्टेशन येथील प्रभारी श्री प्रशांत भस्मे यांनी दि.०१/०६/२०२६ रोजी २०.०० वा. ते दिनांक ०२/०६/२०२६ रोजी रात्रौ ०२.०० वा. पर्यंत पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री शिवप्रकाश मुळे, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार तेलंगे, विशाल शिंदे, जाधवा, नागरे, होळकर यांना फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत कोंबीग ऑफरेशन साठी नेमण्यात आले होते. रात्रगस्त सतर्क पेट्रोलींग दरम्यान विशाल अपार्टमेंट जवळील सार्वजनिक रस्त्यावर कसबा पेठ पुणे येथे एक इसम मोपेड गाडीसह संशयास्पद आढळुन आला. त्याचे नाव पुष्कर सुभाष पिंगट वय २७ वर्षे, रा.स.नं.११६३, विशाल अपार्टमेंट ६ वा मजला, फ्लॅट नं. २३, कसबा पेठ पुणे असे असुन, पोलीस स्टाफचे मदतीने त्याचे जवळील निळ्या रंगाची सॅक बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये २९ नग एल.एस.डी. स्टॅम्प, ३० ग्रॅम सुका चरस, ६७ ग्रॅम ओजी कोश होयड्रोजेनिक गांजा, ०२ नग इलेक्ट्रीक वजन काटा, लहान मोठ्या प्लॉस्टीक पिशव्या असा एकुण ५,४८,०००/- रु चा अंमली पदार्थ व त्यासाठी लागणारे इतर माल हस्तगत करण्यात आलेला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी विरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन, गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप- निरीक्षक संतोष गोरे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. प्रविण दराडे, मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे (अतिरीक्त कार्यभार), श्री.पी. आर. पाटील, मा. सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने, यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शिवप्रकाश मुळे, पोलीस उप-निरीक्षक अरविंद शिंदे, पोलीस अंमलदार नितीन तेलंगे, विशाल शिंदे, नितीन जाधव, चेतन होळकर, तानाजी नांगरे, संतोष नागरे, गजानन सोनुने, महेश पवार, शशीकांत ननावरे, महिला पोलीस अंमलदार सारिका गुंजाळ यांनी केली.




