मतमोजणीनिमित्त उद्या ‘या’ भागातील वाहतुकीत होणार बदल…

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवारी (२३ नोव्हेंबर) वाकड, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

Advertisement

पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनिमित्त शनिवारी (२३ नोव्हेंबर) वाकड, हिंजवडी आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी प्रसृत केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी थेरगाव येथील कामगार भवन येथे होणार आहे. भोसरी, पिंपरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात तर, मावळ मतदारसंघाची मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन विद्यालयात शनिवारी होणार आहे. या मतमोजणीनिमित्त परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page