पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये घडलेल्या विषारी दारुच्या सेवनामुळे हडपसर व दापोडी, पुणे येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने दापोडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ११४/२०२६ भा.न्या. संहिता कलम- १०५, ११०, १२३, १२५,२७५ व ३(५) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई),६८, ८१, व ८३ व हडपसर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ३७९/२०२६ भा. न्या. संहिता कलम १०५, ११०, १२३,१२५,२७५ व ३(५) सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई),६८, ८१, व ८३ अन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. सदर गुन्ह्यांचा तपास मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक- २९/०५/२०२६ रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
नमूद घटनेमध्ये आजपोवेतो दापोडी परिसरातील एकुण ११ इसम मयत झाले आहेत व हडपसर परिसरातील एकुण ०४ इसमांचा मृत्यु झाला आहे. दापोडी पोलीस स्टेशन गुरनं. ११४/२०२६ मध्ये एकुण ०६ आरोपी अटक आहेत. नमूद दोन्ही गुन्ह्यांचा तपास, गुन्हे अन्वेषण विभाग म.राज्य, पुणे मार्फत चालू आहे.