एक वर्षाच्या बालिकेचे अपहरण करणारे आरोपी १६ तासात जेरबंद, बालीका सुखरुप बंडगार्डन पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.

दि. ३०/०५/२०२६ राजी रात्री ०९.१५ वा. सुमारास पुणे स्टेशन परिसरातील दत्तमंदिरासमोर मोकळ्या जागेत भोसले कुटुंबीय हे आपल्या एक वर्षाच्या मुलीसह झोपलेले असताना वरील नमुद वेळी व ठिकाणी काही अज्ञातांनी तिची आई गाढ झोपेत असताना मुलीचे अपहरण केले होते. सदर घटनेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेबाबतची माहिती समजताच गुन्हे शाखा व बंडगार्डन पोलीस स्टेशन यांनी तात्काळ तपास सुरु करुन स्टेशन परिसरातील तसेच आजुबाजुचे जवळपास ६५ हुन अधिक कॅमेरे तपासले असता. मुलीचे अपहरण करणारे महिला व पुरुष एका कॅमेरामध्ये कैद झाले. तसेच पुणे स्टेशन परिसरातील कॅमेरे चेक करीत असताना संशयीत महिला व पुरुष त्या अपहरण झालेल्या मुलीला प्लॅटफॉर्म क्र.४ वरुन निघणाऱ्या पनवेल -नांदेड- पनवेल या रेल्वेमधून घेवून जाताना दिसले. पुणे स्टेशन पासून नांदेड कडे जाणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ तसेच जीआरपी व स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकांना देखील शोध घेणेबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच स्थानिक पो.स्टे. व गुन्हे शाखेची पथके सदर स्थानकांवर रवाना करण्यात आली. काही पथके कुडुवाडी, बार्शी, सोलापुर, लातुर, दौंड या भागात रवाना केली. वरिल ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवर मुलीचा तसेच तीचे अपहरण करणारे संशयीतांचा शोध घेत असताना सदरचे अपहरण करणारे संशयीत इसम हे दौंड रेल्वे स्थानक परिसरात मिळून आले. त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली व अपहरण झालेल्या एक वर्षांच्या बालीकेस सुखरुप पथकाच्या ताब्यात दिले.
सदरची अपहरण झालेल्या बालीकेची सुखरुप सुटका करून तीचे अपहरण करणारे तीन इसमांना ताब्यात घेवून पथक हे पुणे शहर कडे रवाना झाले आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, तेजस्वीनी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री गौहर हसन, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने खंडणी विरोधी पथक २, पोलीस निरीक्षक संदिपान पवार युनिट-५, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पो.स्टे. श्री संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक आरपीएफ, भगवान ईप्पर, पोलीस निरीक्षक, एलसीबी, उस्मानाबाद, सहा. पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पो.स्टे. अभिजीत चौघुले, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम युनिट-४, गुन्हे शाखा, पोलीस उप निरीक्षक, आरपीएफ प्रविण गाढवे, व बंडगार्डन पोलीस स्टेशन स्टाफ व खंडणी विरोधी पथक-२ स्टाफ, तसेच युनिट-५ स्टाफ व युनिट-६ स्टाफ यांनी सदरची कामगिरी केली आहे.




