गांजा हा अंमली पदार्थ विकणा-या दोन इसमास केले जेरबंद..!

दि.१६/०३/२०२६ रोजी पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अलका सरग यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, ज्युपीटर हॉस्पिटल जवळ, बाणेर पुणे या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यास दोन इसम येणार आहेत. सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, बाणेर पोलीस स्टेशन यांना कळविले असता त्यांनी सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणेबाबत सांगितल्याने सदर ठिकाणी पोनि (गुन्हे) श्रीमती अलका सरग, सहा पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, सहा पोलीस निरीक्षक गणेश रायकर व तपास पथक अंमलदारांसह रवाना झाले. तपास पथक पीएमसी जलतरण तलावाचे लगत, ज्युपीटर हॉस्पिटल जवळ, बाणेर पुणे या ठिकाणी सापळा रचुन थांबले असताना रात्रौ ०१/३० वा.चे सुमा दोन इसम होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाचे मोटारसायकलवर सदर ठिकाणी आले. तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे त्यांच्या जवळ जात असताना सदर दोन इसम हे त्यांना बघुन पळून जात असताना तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी नमुद इसमांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव १) अभिषेक भिका बोरसे, वय-२४ वर्षे, रा. चौधरी यांचे घरामध्ये, ३ रा मजला, साईदत्त रेसिडेन्सी, रानमळा हॉटेल समोर चाफेकर चौक, चिंचवड, पुणे २) अक्षय मिका बोरसे, वय २९ वर्षे, रा. सदर असे सांगितले. नमुद इसमास त्यांचे जवळ असलेल्या लाल रंगाचे बॅगबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सदरची बॅग चेक केली असता त्यामध्ये एकुण ०३.०३४ किलोग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने नमुद इसमांविरुध्द बाणेर पोलीस स्टेशन गु.र.नं.६८/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) ii (ब), २२ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांचे घरझडती मध्ये एकुण १३.०८८ किलोग्रॅम निव्वळ गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा, चिकटपटी व विमल कंपनीच्या दोन मोठ्या बॅग असा एकुण ६,५५,५१०/- रु. की. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांकडुन एकुण १६.१२२ किलोग्रॅम गांजा, मोटारसायकल असा एकुण ८,७६,४९०/-रु की. चा मुद्देमाल माल जप्त करण्यात आला आहे. नमुद गुन्ह्याचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक गणेश रायकर हे करीत आहेत.

Advertisement

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४. श्री. चिलुमुला रजनीकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे, यांचे मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांचे सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवातिरक, रोहीत पाथरुट, स्वप्नील मराठे बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page