प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पुणे – एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी (31 ऑक्टोबर) सकाळी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया अकाउंटवर देण्यात आली आहे.

Advertisement

आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे. पुढील 3-5 दिवस बाळासाहेब रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page