अर्थसंकल्पात शेतीकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; कृषी क्षेत्रासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींची तरतूद

नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकलपात शेतकरी वर्ग सरकारकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहे. अशातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी भरीव रकमेची तरतूद केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये शेतीसाठी तब्बल 1.52 लाख कोटींचा निधी उभारला जाणार आहे. असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. यातून शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जाणार आहे. आगामी वर्षात आम्ही नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.

Advertisement

कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा

  1. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार
  2. कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
  3. डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर
  4. शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
  5. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल. त्यातून शेतीपिकांंचं सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.
  6. या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे
  7. सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवणार
  8. 32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page