अवैद्यरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेस, छापा कारवाई मध्ये पकडण्यात आले यश..!

अवैद्यरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेस, छापा कारवाई मध्ये पकडण्यात आले यश

मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ १, पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, पुणे शहर यांनी अवैद्यरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी यांचा शोध घेण्याबाबत बांगलादेशी घुसखोरविरोधी पथक व फरासखाना ए.टी.सी. पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. फरासखाना ए.टी.सी. पथकातील पोलीस अंमलदार विशाल शिंदे व वसिम शेख यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतील रेड लाईट एरिया, बुधवार पेठ पुणे येथे एक बांगलादेशी रहिवाशी महिला असून, ती पासपोर्टसह भारत देशात फिरण्यासाठी तीन महिन्याचा व्हिसा प्राप्त करुन आली असुन, तीचा व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ती बांगलादेशात परत गेलेली नाही. ती बांगलादेशी महिला सध्या क्रांती चौक हॉटेल जवळ, बुधवार पेठ पुणे येथे असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने, सदरची बातमी फरासखाना पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवुन, त्यांचे आदेशान्वये क्रांती हॉटेल जवळ, बुधवार पेठ पुणे छापा कारवाई करुन बांगलादेशी महिला नामे रिना बेगम मोहम्मद मिलन मिया वय ३० वर्षे, रा. ग्राम ग्वालघाट लेन, पोस्ट ढाका, थाना सुत्रापुर, ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशन ढाका,-११०० देश – बांगलादेश हिला ताब्यात घेण्यात आले. सदर महिलेकडे चौकशी करता, ती सन २०१८ मध्ये बांगलादेश येथुन पासपोर्टसह भारत देशात फिरण्यासाठी तीन महिन्याचा व्हिसा प्राप्त करुन आली होती. भारतात आल्यानंतर तीचा व्हिसा संपल्यानंतर देखील ती अवैद्यरित्या छुप्या पध्दतीने राहत असुन, ती बुधवार पेठ, पुणे येथे स्वच्छेने वेश्याव्यवसाय करुन, स्वतःचा उदरनिर्वाह करीत असल्याबाबतची माहिती समोर आलेली आहे. तसेच बांगलादेशी रहिवाशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे सदर महिलेस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे.

Advertisement

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा.पोलीस उप-आयुक्त, परि-१ पुणे शहर श्री. कृषिकेश रावले, मा. सहा.पो.आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पोलीस अमंलदार विशाल शिंदे, वसिम शेख, नितीन जाधव, गजानन सोनुने, इसाक पठाण, सावंत कांबळे, भोईटे, बेंद्रे, कवटे, यांनी केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page