आरोपीतांकडुन ०१ गावठी पिस्टलसह, ०२ जिवंत काडतुसे जप्त..!

मा. वरिष्ठांचे आदेशाने पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ रोजी पर्यत अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणा-या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत ओदशीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिनांक २३/०४/२०२६ रोजी युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक, सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, मपोहवा पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश माने, उमेश शेलार असे मिळुन युनिट ६ चे हददीत पेट्रोलींग करत होते.

Advertisement

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रभात शांताराम आंबेकर हा इसम वडकीनाला या परिसरामध्ये फिरत असुन त्याकडे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, सदर ठिकाणी वरिल स्टाफसह जावुन शिताफिने संशयीत इसमाला जागेवर पकडुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे मिळून आले. सदरचा एकुण ४१२००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नामे प्रभात उर्फ संदिप शांताराम आंबेकर वय २६ वर्षे रा. साबळेमळा, वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे याचेविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १७१ /२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, बाळासाहेब सकटे, प्रशांत कर्णवर, नानासाहेब मोरे, अमित कांबळे, म.पो. अंमलदार पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे, गणेश माने, उमेश शेलार यांचे पथकाने केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page