शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात, सायबर चोरट्यांकडून साडेआठ लाखांची फसवणूक

पुणे : शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला साडेआठ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी मुंढवा पोलिसांत ६७ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंबिय मुंढव्यातील केशवनगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान, तक्रारदारांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्याने शेअर बाजाराबाबत माहिती दिली. तसेच, आमच्या कंपनीच्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, असे सांगितले. आमच्या कंपनीकडून चांगला परतावा मिळेल, असे आमीष दाखवले. त्यानुसार तक्रारदार यांनी ८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, पैसे गुंतवणूक केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page