जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांना केले जेरबंद..!

पुणे शहरात जबरी चोरीच्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांचा शोध घेणेबाबत वरिष्ठांकडून आदेशीत करण्यात आले आहे. त्याप्रमाणे दि.०४/०२/२०२५ व दि.०५/०२/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, पोलीस अंमलदार नागेश राख, पुष्पेद्र चव्हाण, व निखिल जाधव असे पुणे शहरात पश्चिम विभागात समांतर रात्रगस्त करत असताना नियंत्रण कक्ष पुणे यांनी कळवले की, फरासखाना पोलीस स्टेशनचे हद्दीत बुधवार पेठ पुणे येथे ०३ इसमांनी भांडणाचा बहाणा करुन धक्का-बुक्की करुन सोन्याची चेन चोरी केली आहे. त्याप्रमाणे वरील रात्रगस्त अधिकारी व अंमलदार तसेच युनिट २ कडील पोउपनि नितीन कांबळे, अमोल सरडे, उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर नेवसे, हनमंत कांबळे, ओमकार कुंभार, पुष्पेद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून फिर्यादी कडून आरोपीतांचे वर्णन व वाहनांची माहिती घेवून तांत्रिक तपास करुन दि.०८/०२/२०२५ रोजी सदर गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून रेकार्ड वरील गुन्हेगार नामे १) समीर ऊर्फ सॅम रज्जाक शेख वय २५ वर्षे रा अण्णा भाऊ साठेनगर अरणेश्वर पुणे २) सोमनाथ कालीदास पवार वय १९ वर्षे रा. सदर ३) अश्रम राजू मुल्ला वय १९ वर्षे रा. नांदेड फाटा सिंहगड रोड पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून जबरी चोरी केलेली सोन्याची चेन व गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकुण १,६५,००० रु कि.चा मुद्देमाल ताब्यात घेवून फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक २८/२०२५ येथे दाखल असलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीतांना अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे सदर आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार असून अधिक तपास चालु आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त सायबर व आर्थिक गुन्हे, पुणे (अतिरिक्त कार्यभार गुन्हे) श्री. विवेक मासाळ, मा. सहा.पो.आयुक्त गुन्हे-१ श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, पोउपनि नितीन कांबळे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, संजय जाधव, शंकर नेवसे, हनमंत कांबळे, शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, पुष्पेद्र चव्हाण निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, व नागनाथ राख, यांनी केलेली आहे.

Advertisement

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page