परिमंडळ क्र. ४ अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन व अवैध दारूविरोधी विशेष मोहीम राबविणेबाबत…!

प्रेस नोट

कार्यालय : पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ४, नागपूर शहर
दिनांक : २२/०४/२०२६

आदरणीय सर,

विषय : परिमंडळ क्र. ४ अंतर्गत कॉम्बिंग ऑपरेशन व अवैध दारूविरोधी विशेष मोहीम राबविणेबाबत.

पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ४, नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २१/०४/२०२६ रोजी रात्री ११.०० ते २२/०४/२०२६ रोजी पहाटे ०२.०० वाजेपर्यंत परिमंडळातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत व्यापक स्वरूपाचे कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

Press Note Combing
सदर मोहिमेत सहायक पोलीस आयुक्त, अजनी विभाग यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रभारी अधिकारी व पोलीस पथकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या कारवाईत एकूण ३० अधिकारी, १०० अंमलदार व १ आरसीपी प्लाटून सहभागी होते.

या ऑपरेशनदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हे प्रतिबंधासाठी विविध ठिकाणी प्रभावी कारवाई करण्यात आली. विशेषतः अवैध दारूविरोधी मोहिम, प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर पावले उचलण्यात आली. हॉटेल, लॉज व संशयित ठिकाणांची सखोल तपासणी करण्यात आली.

Advertisement

अवैध दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व ढाबा चालकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात आली. तसेच तडीपार, एमपीडीए व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित आरोपींच्या घरांवर जाऊन तपासणी करण्यात आली.

या प्रभावी कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून नागरिकांकडून पोलीस कार्यवाहीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

कारवाईचा तपशील :
▪️ दारूबंदी प्रकरणे – २० कारवाई
▪️ एनडीपीएस प्रकरणे – ०२ कारवाई
▪️ तडीपार/रेकॉर्डवरील आरोपी तपासणी – ७२ व्यक्ती
▪️ सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन (कलम ११०/११७) – ६४ कारवाई
▪️ कोपटा (प्रतिबंधात्मक कारवाई) – २१ कारवाई
▪️ वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू असलेली आस्थापने – १२ कारवाई

परिमंडळ क्र. ४ अंतर्गत अशा प्रकारच्या प्रभावी व सातत्यपूर्ण मोहिमा पुढील काळातही राबविण्यात येणार असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त, परिमंडळ क्र. ४
नागपूर शहर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page