बोपदेव घाट प्रकरण, दुसऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी अटक केली. सामूहिक अत्याचार प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शेख, कनोजिया यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे.
बोपदेव घाट परिसरात रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. आता या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




