एनडीपीएस गुन्हयातील फरार आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडून अंमली पदार्थ व ०१ पिस्टल, ०२ मॅगझीन, ०७ जिवंत काडतुसे केली जप्त..!

दि. २१/०४/२०२६ रोजी वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२१/२०२५, एन.डी.पी.एस. दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे अक्रम अजिज शेख, रा. गुलटेकडी, पुणे हा कॅम्प पुणे येथे येणार असल्याची बातमीदारामार्फत गोपनिय माहिती मिळाली. त्याअनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कॅम्प येथे सापळा लावून पाहीजे आरोपी अक्रम अजिज शेख, वय ३२ वर्षे रा. गुलटेकडी, पुणे यास शिताफीने पकडुन ताब्यात घेवून त्यास वानवडी पोलीस स्टेशन येथे आणुन नमुद गुन्हयात आरोपीस अटक करून त्याचे राहते घराची घरझडती घेतली असता घरझडतीमध्ये एकुण २७,६०,०००/-रुपये किंमतीचा एकुण ९२० ग्रॅम एम. डी अंमली पदार्थ सदृश पावडर आणि ४७,०००/-रु.किं. चे एक देशी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे लोखंडी पिस्टल मॅग्झीनसह असलेले, एक एक्स्ट्रा मॅगझीन व ०७ जिवंत काडतुसे असा एकूण २८,०७,०००/- मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ ०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (अतिरिक्त कार्यभार) वानवडी पो. स्टे श्रीमती संगीता जाधव यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अर्शद सय्यद, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, राहुल माने, महिला पोलीस अंमलदार सुशमा घोळवे व रक्षा राहुलकर यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page