दरोडयाच्या गुन्हयातील मागील एक वर्षापासुन फरार आरोपीस घेतले ताब्यात..!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोस्टे पुणे श्री. संतोष पांढरे, यांचे आदेशान्वये तपास पथकातील अधिकारी श्री. धिरज गुप्ता व तपास पथकातील अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर गायकवाड, यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दरोडयाच्या गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे मुनवर ऊर्फ मुनीर शेख हा मालधक्का चौकाचे जवळ थांबलेला आहे असे खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी जावुन इसम नामे मुनवर ऊर्फ मुनीर शेख वय ३९ वर्षे रा. शेर मोहम्मद पठाण यांचेकडे भाड्याने स.नं.४२, न्यु ग्रेस स्कुलजवळ, मिठानगर, कोंढवा, पुणे यास ताब्यात घेवुन तपास केला असता बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. ५२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१०(२), ३५१ (२) (३),३५२, मपोका. ३७(१) (३), सह १३५ असल्याचे निष्पन्न झाले. तसेच बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. २६/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०४(२) गुन्हयातील एकुण ४०,०००/-रुपये किंमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, मा. पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड, मनिष संकपाळ, यांचे पथकाने केली.




