ब्रँडेड कपड्याचे पार्सल चोरी करणा-या महिलेचा अवघ्या ०४ तासात शोध..!

येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७८१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०२ (२) अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यात फिर्यादी यांचा स्वतःचा टेम्पो असुन ते पोर्टरव्दारे डिलीवरी करत असतात. दि.१८/११/२०२५ रोजी नेहमीप्रमाणे फिर्यादी यांनी एका नामांकित कंपनीचे कपड्यांचे पार्सल टेम्पोमध्ये आणले व टेम्पो प्रतिकनगर येथे रोडच्या कडेला पार्किंगला लावला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी टेम्पोजवळ गेले असता टेम्पोमधील माल चोरी झाल्याचे लक्षात आल्याने येरवडा पोलीस स्टेशन येथे सदर बाबत गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनांच्या अनुषंगाने मा. पोलीस उपायुक्त, परि-०४, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांनी सदरबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथक प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे व पोलीस अंमलदार शैलेश वाबळे यांनी सदर भागात जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी एका कंस्ट्रक्शन कंपनीचे रोडवरील सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता त्यामध्ये एक महिला टेम्पोजवळ जाऊन त्यातुन माल काढुन घेऊन जाताना दिसुन आले. त्यानुसार सदर भागात वर नमुद महिलेचा बातमीदारामार्फत शोध घेतला असता सदरची महिला त्याच भागात राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर तपासाचे अनुषंगाने पोलीस स्टाफ यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन वर नमुद वर्णनाची महिला मिळुन आली असता तिला ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता तिने तिचे नाव नंदा विकास काळे, वय-४५, रा-पाण्याचे टाकीजवळ, चंद्रमानगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले तिने नमुद गुन्ह्याची कबुली दिलेने तिस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परि-०४, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग. श्रीमती प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केली.
σ




