स्वतःच्या नावाच्या दहशतीसाठी तोडफोड करणारा फरार आरोपी अखेर जेरबंद..!

येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७०६/२०२५ भा.न्या.सं.क ११८(१),१८९(२),१९०,१९१ (२) सह भारतीय हत्यार कायदा ४ (२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी येरवडा पोलीस स्टेशन रेकार्डवरील असुन यापुर्वी एमपीडीए, मकोका अंतर्गत कारवाई होऊन जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर येरवडा परीसरात तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेची दखल घेवुन गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला असताना, सदर प्रकरणी आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत मा. वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.

Advertisement

सदर सुचनांच्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी हा पवार वस्ती, लोहगाव भागात त्याच्या मित्राकडे येणार असलेबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, नटराज सुतार, अमोल गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन सदर आरोपी हा त्याठिकाणी आल्यानंतर त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव समीर शब्बीर शेख, वय-२७, रा-जयजवाननगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. सदरचा गुन्हा हा स्वःतच्या नावाची दहशत करण्यासाठी तसेच फिर्यादी यांचेसोबत जुन्या भांडणाच्या रागातुन केल्याचे सांगितले.

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन श्री. अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजय ठाकर, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार महेंद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केलेली आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page